पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. सीबीआयनं गेल्या काही दिवासांपूर्वी भोसले यांच्या घरी छापे टाकले होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय नेमकी काय कारवाई करणार येणाऱ्या काळात समोर येईल. ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता.