श्रीरामाच्या वादग्रस्त वक्तव्यानं रोष, आव्हाड यांचा वध करणार; थेट अयोध्येतून काय आली धमकी?
परमहंस आचार्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा वध करण्याची धमकीच दिली. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या शिबीरातून जितेंद्र आव्हाड यांनी रामाला मांसाहारी म्हटलं. यावरून महाराष्ट्रापासून ते अयोध्येत रोष निर्माण झालाय. वाढता रोष पाहता जितेंद्र आव्हाड पुन्हा माध्यमांसमोर आले आणि अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व असल्याचे सांगून खेद व्यक्त केला
मुंबई, ५ जानेवारी २०२४ : प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात रोष निर्माण झालाय. अखेर आव्हाड यांनी खेद हा शब्द वापरत सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र याप्रकरणी सरकारकडून कारवाईची मागणी भाजपचे नेते आणि अयोध्येतील काही साधूंनी केली. तर परमहंस आचार्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा वध करण्याची धमकीच दिली. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या शिबीरातून जितेंद्र आव्हाड यांनी रामाला मांसाहारी म्हटलं. यावरून महाराष्ट्रापासून ते अयोध्येत रोष निर्माण झालाय. वाढता रोष पाहता जितेंद्र आव्हाड पुन्हा माध्यमांसमोर आले आणि अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व असल्याचे सांगून खेद व्यक्त केला. शिर्डीमध्ये तीन दिवसांचं राष्ट्रवादीचं शिबीर होतं. यातून आव्हाड अजित पवार यांच्यासह भाजपवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र अचानक आव्हाड यांची गाडी श्रीरामापर्यंत पोहोचली. आणि त्यांनी थेट राम मासांहारी असल्याचे त्यांनी म्हटलं.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

