सभेपूर्वीच राणा-कडू यांच्यात वाद उफळला अन् आले आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तिथे उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत.
नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सध्या अमरावती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तिथे उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. उद्या या मैदानावर अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून सध्या चांगलाच वाद उफाळून येतोय. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. उद्या याच मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि बच्चू कडू यांची सभा होणार असल्याचे समजते. त्यामुळे याच मैदानाच्या आरक्षणावरून बच्चू कडू-राणा आमने-सामने आलेत. बघा व्हिडीओ…