शहिदांच्या स्मरणार्थ अमरावतीतील तिरंगा सायकल रॅलीत बच्चू कडू यांचा सहभाग, किती किमी चालवली सायकल?
VIDEO | देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्याकडून शहिदांच्या सन्मानार्थ शहीद स्मारक ते शहीद स्मारक सायकल रॅलीचे आयोजन
अमरावती, १५ ऑगस्ट २०२३ | देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शहिदांच्या व तिरंगाच्या सन्मानार्थ शहीद स्मारक ते शहीद स्मारक सायकल झाली आयोजन केले होते. याची सुरुवात अमरावती शहरातील नेहरू मैदानातील शहीद स्मारकापासून झाली असून याची सांगता अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील शहीद स्मारकावर करण्यात आली. झेंडा कोणताही असो त्या झेंड्यासोबत तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे; तसेच देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ ही रॅली असल्यासही बच्चू कडू म्हणाले. यापूर्वीही पावनखिंडची मोहीम आम्ही सर केली आहे, त्यामुळे तीस किलोमीटर सायकल चालवणे फार कठीण जाणार नाही तर कित्येक वर्षानंतर आम्ही सायकल चालवत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

