Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाने काय दिले आदेश?
अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होत आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. राज्य सरकारकडून अक्षय शिंदेच्या आई वडिलांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आला.तर आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर कुटुंबियांनी अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांची वणवण सुरू आहे. कळवा आणि बदलापूरमध्येही जागा मिळत नसून आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी विरोध होत आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा, असे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. जागा उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टाने सरकारला आदेश दिले आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीन देण्यास तीन ठिकाणी विरोध करण्यात आला आहे. यानंतर आरोपी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी याबद्दल हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आता सुनावणी पार पडली. यावेळी वकील अमित कटाकनवरे यांनी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे बाजू कोर्टात मांडली. या सुनावणीवेळी आरोपी अक्षय शिंदेचे आई-वडीलही कोर्टात उपस्थित होते.
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
