AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Statue in Fort  : फोर्टमधील बाळासाहेब ठाकरे पुतळा झाकला, दुरुस्ती की निवडणुकीचे कारण? चर्चेला उधाण

Balasaheb Statue in Fort : फोर्टमधील बाळासाहेब ठाकरे पुतळा झाकला, दुरुस्ती की निवडणुकीचे कारण? चर्चेला उधाण

| Updated on: Jan 05, 2026 | 12:13 PM
Share

मुंबईतील फोर्ट परिसरात रिगल सिनेमाजवळ असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हिरव्या कापडाने झाकण्यात आला आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती असताना, साफसफाई आणि दुरुस्तीसाठी हा पुतळा झाकल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कृती केल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मुंबईतील फोर्ट परिसरातील रिगल सिनेमाजवळ असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला हिरव्या कापडाने झाकण्यात आले आहे. पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजी करण्यासाठी हे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंची जयंती असते, त्याआधीच ही घटना घडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील हा एकमेव पुतळा असून, 23 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले होते. आता निवडणुकीचा कालावधी सुरू असताना, रिगल सिनेमाजवळील हा पुतळा पूर्णपणे हिरव्या कापडाने झाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वॉर्ड ऑफिस किंवा मुंबई महानगरपालिकेकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पुतळ्याच्या आत डागडुजीचे काम सुरू असल्याचे दिसत असले तरी, ऐन निवडणुकीच्या काळात बाळासाहेबांचा पुतळा का झाकण्यात आला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Published on: Jan 05, 2026 12:13 PM