Balasaheb Thorat on Vikhe Patil | विखे पाटलांना फार कमी वेळ मिळालाय, त्यात त्यांनी चांगलं काम करावं

राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे. त्या काळात त्यांनी चांगलं काम करावं, असा टोला लगावला आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 16, 2022 | 7:27 PM

अहमदनगर: राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नगरच्या राजकारण पुन्हा पेटू लागले आहे. आता नवनिर्वाचित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारच्या काळातील महसूल खात्यातील निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून जोरदार राजकारण तापले आहे. या चौकशीच्या वक्तव्याचा समाचार घेताना बाळासाहेब थोरात यांनी, आमच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करायची तर ती देखील करावी असे म्हटलं आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे. त्या काळात त्यांनी चांगलं काम करावं, असा टोला लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें