Ajit Pawar : अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच…
राज्यात एकाच टप्प्यात २० तारखेला मतदान पार पडणार असून येत्या २३ तारखेला निकाल लागणार आहे. दरम्यान, आज प्रचारासभांच्या तोफा थंडावणार आह. अशातच अजित पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका आजच्या शेवटच्या दिवशीही बघायला मिळाला.
येत्या २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यात एकाच टप्प्यात हे मतदान पार पडणार असून येत्या २३ तारखेला निकाल लागणार आहे. दरम्यान, आज प्रचारासभांच्या तोफा थंडावणार आह. अशातच अजित पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका आजच्या शेवटच्या दिवशीही बघायला मिळाला. दरम्यान अजित पवारांची सभा असताना त्या सभास्थळी एक मुलगी गर्दीत हरवल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवारांनी भाषणाच्या स्टेजवरूनच माईकवरून गर्दीत हरवलेल्या मुलीचं नाव पुकारलं. मात्र नाव पुकारल्यानंतर अजित पवारांनी यावर जे भाष्य केलं त्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला… अजित पवार म्हणाले, ‘श्वेता कोकाटे नावाची मुलगी… ती काय समोर आहे… कुठे हरवली राव’, असं अजित पवार म्हणाले. तर दादांच्या सभेत कशी मुलगी हरवेल? असं मिश्किल भाष्य करत खोचकपणे सवालही केला. पुढे ते असेही म्हणाले, ही काय ५०० रूपये देऊन आणलेली जनता नाही. ही आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही.. असं बोलत असताना कार्यकर्त्यांसह समर्थकांनी एकच घोषणाबाजी केली… त्यावर त्यांना थांबवत अजित पवार म्हणाले, अरे थांबा पुन्हा ६ वाजतील प्रचाराची वेळ संपेल..
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

