Municipal Corporation : तयारीत राहा… राज्य निवडणूक आयोगाचे थेट आदेश, महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग
पुणे महापालिकेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात ३ हजार कोटींच्या कामांचे उद्घाटन करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका निवडणुकांसाठी तयारीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील आगामी मुंबई आणि पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आला असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिका आयुक्तांना निवडणुकांसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यात आचारसंहिता, अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रांसाठी सज्ज राहणे यांसारख्या सूचनांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले होते. हा प्रवेश ठाकरे गटासाठी एक महत्त्वाचा राजकीय धक्का मानला जात आहे. दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज भाजप पुण्यात आपले शक्तीप्रदर्शन करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते ३ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
अॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद

