Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्येचा वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, कोर्टानं स्पष्टच म्हटल…
कराड आणि त्यांच्या साथीदारांवर अवदा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी वसूल करण्याचा आरोप आहे. कोर्टाला साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे मिळाले आहेत ज्यात कराडचा सक्रिय सहभाग स्पष्टपणे दिसून येतो. या प्रकरणात 20 गुन्हे दाखल झाले असून त्यात सात गंभीर गुन्हे आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे, असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. वाल्मिक कराड यांनी अवदा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा कोर्टात उल्लेख केला गेला आहे. शिवाय वाल्मिक कराड सह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर सात गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षात दाखल झालेले आहेत. वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुद्धा आहेत. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवदा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी हा कट रचला आहे. तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टानं म्हटलं आहे.
Published on: Jul 30, 2025 11:40 AM
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
