Beed Floods : भयानक…. भीषण शांतता, बीडमध्ये अतिवृष्टी, पुराचा गावाला वेढा; बघा ड्रोन व्ह्यू
मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नांदूर हवेली गाव पूर्णपणे वेढले गेले आहे. 23 लोक एका घरात अडकले असून एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. आमदार संदीप क्षीरसागर देखील मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सिंधफणा नदीला भीषण पूर आला आहे. या पुराचा सर्वात मोठा फटका नांदूर हवेली गावांना बसला आहे. मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीत संपूर्ण गाव पूर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे, या पुराच्या पाण्यात 23 नागरिक एका घरात अडकून पडले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहे. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील मदतकार्यात सहभाग घेतला असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून मदतकार्याला जोरदार चालना देण्यात आली आहे.
Published on: Sep 22, 2025 05:33 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

