AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'... तू होते का माझी परी?', गौतमी पाटील हिला पत्र लिहून पठ्ठ्यानं केली थेट लग्नाची मागणी

‘… तू होते का माझी परी?’, गौतमी पाटील हिला पत्र लिहून पठ्ठ्यानं केली थेट लग्नाची मागणी

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 31, 2023 | 8:42 AM
Share

VIDEO | 'तू भारी पण तुझ्या घरी अन्...', गौतमी पाटील हिला लिहिलेलं बीडच्या तरुणाचं पत्र व्हायरल, बघा पत्रात काय म्हटलंय?

बीड : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील ही सध्या नेहमीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी तिच्या डान्समुळे, तर कधी तिच्यावर होणाऱ्या टीकेमुळे. पण आपल्या नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या, गौतमी पाटीलची सध्या जोरदार चर्चा सुरूये ती म्हणजे तिला लिहीलेल्या एका पत्रामुळे… बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहीत थेट थेट लग्नाची मागणी घातली आहे. “गौतमी तुझ्या इच्छा अटी सर्वमान्य, बोल तू होती का माझी परी..” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता देत लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं या पठ्ठ्यानं थेट म्हटलंय.

“गौतमी पाटील तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण की मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. गौतमी तू मुलाखतीत म्हणालीय की, मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही. त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे. तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत”, असं त्यानं पत्रातून म्हटलंय.

Published on: May 31, 2023 08:36 AM

Follow Us