Beed : तुझा पण संतोष देशमुख करु… ‘त्याला’ रस्त्यात गाठलं अन् धारधार शस्त्रानं….बीडमध्ये चाललंय काय?
गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अद्याप संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
बीडमध्ये तरूणाला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुझा पण संतोष देशमुख करू असं म्हणत बीडमधील एका तरूणावर धारदार शस्त्रानं संपूर्ण शरीरावर वार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. इतकी मोठी गंभीर घटना घडल्यानंतरही बीड पोलिसांकडून याची दखल घेतली गेली नसल्याचे सांगितले जातंय. या प्रकारानंतर बीड पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. तर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. दरम्यान, या मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Published on: Jun 16, 2025 03:38 PM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

