खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला! तेजू भोसलेने सांगितला थरार
बीडमधील शिरूर कासार येथे सतीश भोसले यांच्या कुटुंबीयांवर मध्यरात्री एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. दोन गाड्यांमधून आलेल्या १५ जणांनी धारदार शस्त्रांनी महिलांना मारहाण केली. यात तेजु भोसले यांच्यासह पाच-सहा महिला जखमी झाल्या.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबीयांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गाड्यांमधून आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने भोसले यांच्या पत्नी आणि इतर महिला नातेवाईकांना मारहाण केली. हल्लेखोरांच्या हातात कुऱ्हाड, तलवारी, दगड आणि काठ्या होती, असे जखमींनी सांगितले.
या हल्ल्यात पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून, काही जणांना डोक्याला मार लागला आहे. हल्लेखोरांनी जातिवाचक शिवीगाळ करत इथे राहू नका, घर सोडून निघून जा, अशी धमकी दिल्याचे पीडितांनी म्हटले आहे. रामदास बडे, अजिनाथ खरमाटे, संदीप ढाकणे आणि माऊली शिरसाठ यांच्यासह काही जणांना ओळखल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही, केवळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित कुटुंबाकडून तात्काळ गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी होत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

