“जीव मुठीत घेऊन जाताना…”, पर्यायी मार्ग नाही, पूल बांधण्याची मागणी
बीडमध्ये जीव मुठीत घेऊन शेतकरी नदीतून (River) पलीकडे जाताना दिसतायत. एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. नदीवर पूल बांधण्याची ग्रामस्थांनी मागणी केलीये.
बीड: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rains) झालीये. गेल्या आठवड्यापासून चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कॉलेजच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्याला तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कुठे कमरेइतकं पाणी तर कुठे चक्क छाती इतकं पाणी. पाऊस जोरदार झाल्यामुळे धरणं (Dam) भरली आहेत, धरणांचा पाणीसाठा वाढलाय त्यामुळे अर्थातच विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. बीडमध्ये जीव मुठीत घेऊन शेतकरी नदीतून (River) पलीकडे जाताना दिसतायत. एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. नदीवर पूल बांधण्याची ग्रामस्थांनी मागणी केलीये.

