Bhai Jagtap | महागाईविरोधातील आंदोलनादरम्यान भाई जगताप आणि झिशान सिद्धीकी भिडले
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाई जगताप आणि झिशान सिद्धीकी भिडल्याचे आज पाहायला मिळाले. महागाईविरोधातील आंदोलनादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. ट्रकवर चढण्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात तसेच मोदी सरकारच्या नीतीविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेसचे नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पदन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांना घेऊन मुंबई काँग्रेसने पदयात्रेचे आयोन केले होते. या यात्रेदरम्यान भाई जगताप बोलत होते. दरम्यान, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाई जगताप आणि झिशान सिद्धीकी भिडल्याचे आज पाहायला मिळाले. महागाईविरोधातील आंदोलनादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. ट्रकवर चढण्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

