WITT Global Summit : ‘या’ कंपन्यांना होणार फायदा, SBI चे माजी अध्यक्ष रजनीश कुमार बँकिंग सिस्टीमविषयी काय म्हणाले?
गेल्या 40 वर्षांत देशाची बँकिंग सिस्टीम कशी बदलत गेली आहे आणि फिनटेक कंपन्यांना त्याचा कसा फायदा होत आहे हे रजनीश कुमार यांनी सांगितले. SBI चे अध्यक्ष असताना YONO सारखी सेवा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे रजनीश कुमार म्हणाले की....
नवी दिल्ली | 26 February 2024 : TV9 नेटवर्कच्या वार्षिक ग्लोबल समिट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’मध्ये BharatPe चे संचालक आणि SBI चे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांनी बदलत्या बँकिंग प्रणाली आणि फिनटेक कंपन्यांना होणारे फायदे यावर चर्चा केली. गेल्या 40 वर्षांत देशाची बँकिंग सिस्टीम कशी बदलत गेली आहे आणि फिनटेक कंपन्यांना त्याचा कसा फायदा होत आहे हे त्यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, देशातील बँकिंग व्यवस्थेत गेल्या 40 वर्षांत मोठे बदल झाले आहेत. ज्याचे जनतेने मनापासून स्वागतही केले आहे. ते म्हणाले की लोकांचा आता रोख रकमेऐवजी फोनद्वारे पेमेंट करण्यावर अधिक विश्वास आहे. लोकांना डिजिटल पेमेंट मोड अगदी सोपा आणि सहज वाटू लागलाय. आता मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगचे युग आहे. एकेकाळी आम्ही टाइपरायटरपासून सुरुवात केली. तेव्हा मी SBI च्या HR विभागात होतो. तेव्हापासून अनेक बदल झाले आहेत. परंतु ऑगस्ट 2014 मध्ये जन धन योजना लागू झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात मोठा बदल झाल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: Feb 26, 2024 02:09 PM
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
