AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Global Summit : देशात AI किती मोठे चॅलेंज? आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात येणार?

WITT Global Summit : देशात AI किती मोठे चॅलेंज? आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात येणार?

| Updated on: Feb 26, 2024 | 1:35 PM
Share

'व्हाट इंडिया थिंक्स टुडे'मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तज्ञांनी AI ची आव्हाने आणि शक्यता यावर भाष्य केले. जगभरात विविध क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. दरम्यान, 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर चर्चा झाली.

नवी दिल्ली | 26 February 2024 : TV9 नेटवर्कच्या वार्षिक ग्लोबल समिट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तज्ञांनी AI ची आव्हाने आणि शक्यता यावर भाष्य केले. जगभरात विविध क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. दरम्यान, ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर चर्चा झाली. ग्लोबल समिटमध्ये एआय तज्ज्ञ म्हणून, रिलायन्स जिओचे मुख्य डेटा वैज्ञानिक डॉ. शैलेश कुमार, सॅमसंग एआय व्हिजनचे संचालक आलोक शुक्ला आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर अनुराग मैरल, चित्रपट निर्माता आणि MARZ चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोनाथन ब्रॉन्फमन आणि मायक्रोसॉफ्टचे समिक रॉय यांनी त्यांचे विचार मांडले. यावेळी AI क्षेत्रातील दिग्गजांनी एआय तंत्रज्ञान जग कसे बदलत आहे आणि त्यातील आव्हाने लक्षात घेऊन आपण त्याचा माणसाच्या फायद्यासाठी कसा वापर करू शकतो हे सांगितले. इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक्स, मनोरंजन, वैद्यकीय, जीवशास्त्र, कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये AI तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावत आहे. पण जगात AI हा लोकांच्या नोकऱ्यांसाठी मोठा धोका मानला जात आहे. त्याचे धोके आणि शक्यतांवर वेगवेगळ्या तज्ञांचे मत काय आहे, जाणून घ्या.

Published on: Feb 26, 2024 01:35 PM