भोंदूबाबा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश द्यायचे, संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात यांच्या आदेशाने महायुतीचे नऊ मंत्री कारभार करायचे. रुपाली चाकणकर हे तर हिमनगाचे टोक आहे. असे अनेक बाबा आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
नाशिकचे भोंदूबाबा प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर हे हिमनगाचे टोक आहे, एक बाबा गजाआड गेला आहे, पण असे अनेक बाबा आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना हे भोंदूबाबा खरात शिक्षण खात्यातील बदल्या करवून घ्यायचे. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील महत्वाचा पोर्टफोलिओ सांभाळणारे नऊ मंत्री बाबांचे भक्त आहेत. भोंदूबाबा ट्रायडंटवरुन या मंत्र्यांना आदेश द्यायचे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हिंदू धर्मातील या भोंदूगिरीविरुद्ध बाळासाहेबांनी नेहमीच आवाज उठवला. या हिंदूत्वासाठी बाळासाहेबांची शिवसेना सोडून ते गेले आहेत का ? असाही सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

