Washim | ठाकरे गटाला मोठा धक्का! रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश
वाशिम नगरपालिकेच्या राजकारणात भाजपला मोठं बळ मिळालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

या पक्षप्रवेशामुळे वाशिममध्ये भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचं मानलं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजपकडून या पक्षप्रवेशाचे स्वागत करण्यात आले असून राज्यातील विविध भागांत पक्ष विस्तारासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातून झालेल्या या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांची यावर काय प्रतिक्रिया येणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 24, 2026 11:23 AM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...