Prakash Shendge | आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा? ऑडिओ क्लिपची चौकशी करा : प्रकाश शेंडगे

आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती मध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे. अमरावती ची एक ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली आहे. एक दलाल विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढतोय तो त्यांना मी न्यासा कंपनी कडून असल्याचे सांगत आहे.

आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती मध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे. अमरावती ची एक ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली आहे. एक दलाल विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढतोय तो त्यांना मी न्यासा कम्पनी कडून असल्याचे सांगत आहे. परीक्षेत पास करण्यासाठी तो 15 लाखाची मागणी करत आहे. हे असं असेल तर किती मोठा घोटाळा झाला आहे, हे समोर येतंय. सहा राज्यात ब्लॅक लिस्ट झालेली ही कंपनी आहे. न्यासा कम्पनी च्या मालकाला 84 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. इतर कंपन्या असताना या कंपनीला कोणाच्या आशीर्वादाने कंत्राट मिळाले या सगळ्याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. या परीक्षा घेण्यासाठी पुन्हा याच न्यासा कंपनीला काम देण्याचे सुरू आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सत्य समोर आलं पाहिजे सीआयडी चौकशी झाली पाहिजे, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI