लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ‘या’ जागा लढवणार, अजित पवार यांनी स्पष्टच म्हटलं…
अजित पवार यांनी कर्जतच्या शिबीरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. तर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघासह चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
कर्जत , १ डिसेंबर २०२३ : अजित पवार यांनी कर्जतच्या शिबीरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. तर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघासह चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले. एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, ही आपली इच्छा आहे. त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या प्रयत्नांसह मेहनत घेणार आहे. दरम्यान, जास्तीत जास्त खासदार निवडून आपल्याला आणावे लागणार आहे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षासा प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या जागा आपण लढवणारच आहोत. पण यासोबत इतर जागा उबाठाच्या ज्या जागा आहेत, तिथं राष्ट्रवादीची ताकद जास्त असेल तिथं भाजप आणि मुख्मयंत्र्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी जागा वाटप करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
!['उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत' 'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Uday-Samant.jpg?w=280&ar=16:9)
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
![सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Dhananjay-Munde-1-1.jpg?w=280&ar=16:9)
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
![कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच' कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/walmik-karad-manoj-jarange.jpg?w=280&ar=16:9)
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
![बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/walmik-karad-property.jpg?w=280&ar=16:9)
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
![डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार? डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/TRUMP.jpg?w=280&ar=16:9)