VIDEO : Pankaja Munde | मराठवाड्यात गंभीर स्थिती, सरकारनं लोकांना तात्काळ मदत करावी : पंकजा मुंडे

मराठवाड्यात आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेलीत. मराठवाड्यातील तब्बल 7 लाख शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. 25 लाख हेक्टरवर जवळपास 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय.

मराठवाड्यात आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली गेलीत. मराठवाड्यातील तब्बल 7 लाख शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय. 25 लाख हेक्टरवर जवळपास 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झालंय. यासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या की, पूर परिस्थितीची गंभीर आहे. यावेळी प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्या कडेला पाहणी करतायेत. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबर च रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI