Reserve Bank Of India Video : मोठी बातमी… तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच…
भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात आपल्या संकेतस्थळावर माहिती देताना असे म्हटले की, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून लवकरच पन्नास रूपयांच्या नव्या नोटा जारी केल्या जाणार आहेत या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी राहणार आहे
लवकरच चलनामध्ये पन्नास रूपयांची नवी नोट येणार आहे. पन्नास रूपयांच्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नोट भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संजय मल्होत्रा यांची शक्तीकांत दास यांच्या जागी नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आरबीआयमध्ये येण्यापूर्वी मल्होत्रा हे भारताचे महसूल सचिव होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात आपल्या संकेतस्थळावर माहिती देताना असे म्हटले की, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून लवकरच पन्नास रूपयांच्या नव्या नोटा जारी केल्या जाणार आहेत. या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी राहणार आहे तर महात्मा गांधी यांचे छायाचित्र कायम राहणार आहे. ही नवी नोट आधीच्या पन्नास रूपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे, असंही भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वी जारी करण्यात आलेल्या ५० रूपयांच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून आर्थिक व्यवहारात चालू राहणार आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

