Mumbai Train Video : लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूरच्या मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरूच, प्रवासी संघटनेकडून थेट इशारा
अंबरनाथ बदलापूरच्या मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. लोकल ट्रेनच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रवाशांना विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून रिटर्न प्रवास करावा लागतोय.
मुंबई लोकल ही असंख्य, लाखो मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. दिवसेंदिवस रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. सकाळच्या वेळात मुंबईच्या दिशेकडे धावणाऱ्या लोकलमध्ये डाऊन करून येणाऱ्या प्रवाशांमुळे होणारा त्रास तर कर्जत, कसारा आणि कल्याणच्या दिशेने येत असताना प्रवाशांना आपल्या गतव्य स्थानवर उतरू न देणं, अशा मुजोर प्रवाशांमुळे इतर प्रवाशांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. अशातच अंबरनाथ बदलापूरच्या मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. लोकल ट्रेनच्या दारात उभे राहणाऱ्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रवाशांना विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून रिटर्न प्रवास करावा लागतोय. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून मुजोर रेल्वे प्रवाशांमुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, अंबरनाथ बदलापूरच्या मुजोर रेल्वे प्रवाशांवर लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मुजोर रेल्वे प्रवाशांवर कारवाई न केल्यास प्रवासी संघटनेकडून आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मुजोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली नाही तर प्रवाशी संघटनेकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, प्रवाशांच्या त्रासाची रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली नाही लोकल ठप्प होण्याची शक्यता रेल्वे प्रवाशी संघटनेच्या इशाऱ्यानंतर वर्तवण्यात येत आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
