Bihar Exit Polls: महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच NDA अन् महाआघाडीत चुरशीची लढत
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. बहुतांश पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळताना दिसत असले तरी, काही एक्झिट पोल महाआघाडीच्या विजयाचे संकेत देत आहेत. ॲक्सिस माय इंडिया, जनो मिरर आणि एआय पॉलिटिक्स या प्रमुख संस्थांनी वेगवेगळे आकडे दिले असून, अंतिम निकाल १४ तारखेला स्पष्ट होईल.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत, ज्यात एनडीए आणि महाआघाडी यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. अनेक एक्झिट पोलनी एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर काही पोल महाआघाडी सरकार स्थापन करेल असे संकेत देत आहेत.
ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला १२१ ते १४१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाआघाडीला ९८ ते ११८ जागा मिळतील. यात भाजपने ५० ते ५६, जेडीयूने ५६ ते ६२ आणि एलजेपीने ११ ते १६ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. महाआघाडीमध्ये आरजेडी ६७ ते ७१, काँग्रेस १७ ते २१ आणि व्हीआयपी पार्टी ३ ते ५ जागा मिळवू शकते. याउलट, जनो मिररच्या एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला १३० ते १४० जागांसह स्पष्ट बहुमत दाखवले आहे, तर एनडीएला १०० ते ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एआय पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला १२२ आणि महाआघाडीला ११८ जागा दाखवून काँटे की टक्कर दर्शवण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल १४ तारखेला जाहीर होणार आहे.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

