Bipin Rawat Funeral : बिपीन रावत यांचं पार्थिव सायंकाळपर्यंत विशेष विमानानं दिल्लीत आणणार, उद्या दुपारी अंत्यसंस्कार

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला (Delhi) आणलं जाणार आहे.

नवी दिल्ली : Bipin Rawat Funeral देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला (Delhi) आणलं जाणार आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे बिपीन रावत यांचं मूळ राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये राज्य सरकारनं तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

Published On - 11:04 am, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI