Special Report | ‘दसरा मेळाव्यासाठी सेनेनंच नियम मोडले’?

शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे

मुंबई : षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Melava 2021) साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात, असा सवाल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI