‘डबल इंजन सरकार’ने आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलावं; पटोलेंचा भाजपला टोला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांनी टोला लगावला आहे. यावेळी पटोले यांनी, फडणीस हे सत्तेत आहेत. राज्यात त्यांचे डबल इंजनचे सरकार आहे
नागपूर : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी आता काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांचे लोक हळूहळू भाजपमध्ये येत असल्याची टीका केली होती. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस यांनी टोला लगावला आहे. यावेळी पटोले यांनी, फडणीस हे सत्तेत आहेत. राज्यात त्यांचे डबल इंजनचे सरकार आहे. मग शेतकरी का आत्महत्या करतो याचे उत्तर आधी द्या असे म्हटलं आहे. तर राजकारण करण्यापेक्षा सत्तेत आहात लोकांना फायदा मिळू द्या, फोडाफोडीमध्ये त्यांना काहीच भेटणार नाही. तर तोडणारी लोक जास्तीत जगू शकत नाही असा टोला लगावला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

