भाजपने रणशिंग फुंकलं! मनपा निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला
महापालिका निवडणुकांसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला ठरला असून आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक आमदाराची पाच कामं केली जाणार आहेत. महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. तर मुंबईत महायुतीचाच महापौर असेल असा निर्धार करायचा आहे. तसंच माध्यमांशी जास्त बोलू नका अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
मनपा निवडणुकीसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला समोर आला असून यात प्रत्येक आमदाराची 5 कामे केली जाणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आता तयार झाली आहे. मनपा निवडणुकीत फायदा होईल अशी कामं आमदारांनी सुचवावी असे आदेश देण्यात आल्यानंतर आता आमदारांकडून कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयात देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत आमदारांची मतं देखील जाणून घेण्यात आलेली आहे. मुंबईसह राज्यात सर्वत्र महायुती म्हणून लढायचं आहे, असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

