विरोधकांमुळे चांगल्या व्यक्तीला राज्यपालपदावरून पायउतार व्हावं लागलं; भाजप नेत्याचं वक्तव्य
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज मंजूर करण्यात आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या काय म्हणालेत, पाहा..
मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आज मंजूर करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी कोश्यारी यांची विनंती मान्य केली आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. विशेषत: “शिवसेनेला त्यांनी लक्ष केलं आहे. भगव्याचा त्याग करून हिरवी वस्त्र परिधान करणाऱ्या नेत्यांना भगसिंग कोश्यारी खूपत होते. त्यांना दु:ख व्हायचं. त्यांचं दु:ख आणि व्यथा मी समजू शकतो.पण त्यांच्यामुळे चांगल्या व्यक्तीला राज्यपालपदावरून पायउतार व्हावं लागलं. भगतसिंग कोश्यांरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”, असं किरीट सोमय्या म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 11:58 AM
Follow Us
Latest Videos
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
