हसन मुश्रीफ कुठे जाणार लवकरच कळणार, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा
कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जायला मियाँ मुश्रीफ यांची परवानगी घ्यावी लागणार का? किरीट सोमय्यांचा सवाल, काय दिला हसन मुश्रीफ यांना सूचक इशारा
कोल्हापूर मधील राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीने छापे टाकले. यानंतर या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते, कोल्हापुरच्या महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आणि हसन मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले. अशातच लवकरच कोल्हापूरला येऊन महालक्ष्मी देवीचे घेणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी कोल्हापुरात येण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्याकडून किरीट सोमय्यांना आव्हान देण्यात आले होते. मात्र आता त्याच मुश्रीफांनी सोमय्यांना कोल्हापुरात येण्यास सांगितले असून कोणती कामं करत आहोत, याचीही पाहणी करावी, असे सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले, ‘ कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जायला मियाँ मुश्रीफ यांची परवानगी घ्यावी लागणार का? सोमय्या हिंदू आहे म्हणून त्याला महालक्ष्मी दर्शनासाठी रोखण्यात आले होते. मात्र आता मियाँ मुश्रीफ सांगतात किरीट सोमय्या तुम्ही जाऊ शकतात. पण आता त्यांना दाखवून देणार मियाँ मुश्रीफ याला कुठे जाण्याची परवानगी मिळणार’, असे कोड्यात बोलून सोमय्यांनी मुश्रीफ यांना सूचक इशारा दिला आहे.
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!

