उद्धव ठाकरे यांना गिरीश महाजन यांनी दिलं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत…
उद्धव ठाकरे यांना नुसतं घरात बसून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार नाहीत, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कोणत्या बांधावर गेलात? असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुलं आव्हानही त्यांनी दिलं
नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : उद्धव ठाकरे यांना नुसतं घरात बसून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार नाहीत, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कोणत्या बांधावर गेलात? कोरोना महामारीच्या काळात लोकं तडफडून मरत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात? कोरोना महामारीतील बॉडी बॅगमध्ये तुमचा मोठा भ्रष्टाचार आहे, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आताचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दररोज किती दौरे करताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरताय, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आताच्या सरकारला बोलण्याचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अधिकार नाही, असेही स्पष्टपणे महाजन म्हणाले. गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकारने केल्या आहेत. समाजातील सर्व घटकांच्या मागे हे सरकार आहे आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसताय. तर संजय राऊत यांचं ऐकूण पक्षाचे १२ वाजवले, असे म्हणत गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केलाय. तर ४८ मधला एक तरी खासदार आणून दाखवा, असं आव्हानही त्यांनी ठाकरेंना दिलंय.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

