ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो… भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. तर मालवणीतील जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. 'मी इलेक्ट्रिक कार देतो. त्यांनी...
ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. तर मालवणीतील जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘मी इलेक्ट्रिक कार देतो. त्यांनी मणिपूर जाऊ द्या पण मुंबईतील मालवणीत जाऊन आमच्या बांधवांवर जे अन्याय होतात त्यावर आवाज उठवावा. उद्धव ठाकरेंसारखे दोगले माजी मुख्यमंत्री, हेच लोक जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हा ते सर्फ सारखे सफेद होते, आमच्याकडे आले तर घोटाळेबाज झाले’, असे शेलार म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना शेलार असेही म्हणाले की, ‘डूबते को तिनके का सहारा…ही म्हण उद्धव ठाकरे यांना लागू आहे. स्वबळ न राहिलेला. स्वतःच्या बळावर निवडणुकीत उ;pभा न राहिला कोणता नेता असेल तर तो उद्धव ठाकरे आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने उभं राहावं’, असं म्हणत शेलारांनी चॅलेंज केलंय.
Published on: Mar 31, 2024 06:57 PM
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
