BJP Atul Bhatkhalkar | मेट्रोविरोधात आंदोलन, भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

मुंबई : मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI