Atul Bhatkhalkar | इतिहासातील सर्वात थिल्लर मुख्यमंत्री, अतुल भातखळकर यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

महामहिम राज्यपाल असा उल्लेख न करता माननीय असा उल्लेख पत्रात राज्यपाल विषयी केला, इतिहासातील हे सर्वात थिल्लर मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रतील आया बहिणी यांना कधीच माफ करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे जुळे भावंड असलेल्या गुजरातशी आमचे एक भावनिक नाते आहे, पण गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय?, असा सवाल करतानाच गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज तीन घटना घडत आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये एक महिन्यांचे विशेष अधिवेशनच बोलवावे लागेल, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर चढवला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महामहिम राज्यपाल असा उल्लेख न करता माननीय असा उल्लेख पत्रात राज्यपाल विषयी केला, इतिहासातील हे सर्वात थिल्लर मुख्यमंत्री आहेत. यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक शक्ती कपूर आहेत. धनंजय मुंडे , संजय राठोडची नावं तर आहेत, आणखीही चार मंत्र्यांच्या नावाची कुजबुज सुरू आहे. महाराष्ट्रतील आया बहिणी यांना कधीच माफ करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI