Chandrakant Patil Video : अधिनेशनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रकांत पाटलांची ठाकरेंच्या नेत्यांची भेट, आदित्य ठाकरेंना दिलेल्या चॉकलेटमध्ये चिठ्ठी?
चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात सर्व आमदार भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, अरविंद सावंत, आंबादास दानवे, अनिल परब, विनायक राऊत यांच्यासोबत संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतल्याचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे संसदीय कार्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदारांची भेट घेतली यावेळी सर्व आमदारांनी त्यांचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच भाजप आणि ठाकरे गटाचे नेत्यांची भेट झाली. नुसती भेटच नाहीतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची खास भेट घेत त्यांना खास गिफ्ट दिल्याचेही व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून दिसून आले. चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना चॉकलेट भेट दिली. यावेळचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भेटले अन् चॉकलेट भेट दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये चिठ्ठी? असल्याची देखील चर्चा होतेय.