‘त्यांच्या’ मनात अश्लिल अर्थ नव्हता, प्रविण दरेकरांच्या वक्तव्यावर Chandrakant Patil यांचं उत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दरेकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत चंद्रकांतदादांनी सारवासारव केली आहे. प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबई : राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माफीची मागणी करत गाल रंगवण्याचा देखील इशारा दिला आहे. या सगळ्या प्रकारानंतर भाजपची मात्र चांगलीच गोची झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दरेकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, असं म्हणत चंद्रकांतदादांनी सारवासारव केली आहे. प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यात जोरदार चर्चा आहे. काल पुण्याच्या शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले.  राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI