तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते, चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर ‘सामना’च्या अग्रलेखात

तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी उत्तरात म्हटलं आहे

“चंद्रकांत पाटील यांनी ‘तोंडाचा फेस, कोणाच्या?’ या अग्रलेखावर मन ढिले केले आहे. त्यांच्या प्रतिक्रियेत कानामात्रेचा बदल न करता जसेच्या तसे छापण्याची दिलदारी सामना दाखवत आहे” असं लिहित ‘सामना’तून चंद्रकांत पाटील यांनी अग्रलेखाला दिलेले उत्तर छापण्यात आले आहे. तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्प्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही आज हाच वाक्प्रचार वापरला. मी हा वाक्प्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते, असं पाटील म्हणाले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI