सुप्रियाताई ही विकृती दिसत नाही का?, चित्रा वाघ यांचा संतत्प सवाल
मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा वाद अजूनही कमी झालेला नाही. उर्फीच्या प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखिल तोफ डागली आहे
सोलापूर : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या कपड्यावरून सध्या अडचणीत आली आहे. तिच्या फॅशेनवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात राळ उडवून दिली आहे. उर्फीनेही चित्रा वाघ यांनी भडकावण्याचे काम केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्यात सुरू झालेला वाद अजूनही कमी झालेला नाही. उर्फीच्या प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखिल तोफ डागली आहे.
चित्रा वाघ यांनी कपड्यावरून उर्फीवर निशाना साघल्यानंतर उर्फीने तोकडे कपडे का घालते? याचं कारण सांगितलं. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्यासाठी तिने फोटोही शेअर केले होते. त्यालवरून देखिल चित्रा वाघ यांनी उर्फीला पुन्हा एकदा टार्गेट करत झापलं आहे.
तिच्या या स्पष्टीकरणानंतर वाघ यांनी उर्फीसारख्या विकृतीला हद्दपार करा. राजकारण करण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना आम्ही गूळ खोबरे देऊन बोलावले नव्हते, असा टोला त्यांनी सुळे यांना लगावला. तर सुप्रियाताई ही विकृती थांबण्यास सांगत आहेत. त्यांना दिसत नाही का?, असा सवालही त्यांनी केला.
Published on: Jan 09, 2023 02:34 PM
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
