Chitra Wagh : ‘कुठं गटाराचं नाव घेताय’, चित्रा वाघ यांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
भाजपने एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधीची तयारी केली होती, असा दावा कऱणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
‘एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, त्याशिवाय मी बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत’, असे वक्तव्य करत संजय राऊत यांना मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांना सवाल केला असताना त्यांनी एकाच वाक्यात राऊतांवर जोरदार हल्लाबोल केल्याच्या पाहायला मिळाले. भाजपने एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधीची तयारी केली होती, असा दावा कऱणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाष्य करताना चित्रा वाघ म्हणाल्या, “कुणाचं नाव, कुठे घेता. चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलेय, कुठे गटाराचं नाव घेता” अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. चित्रा वाघ या दादर येथील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी दाखल होत्या. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता आहे की नाही? असा सवाल केला असता त्या म्हणाल्या, “आमचा सगळया लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री पदी असावा असा अट्टहास, अशी इच्छा होती. ती पूर्ण झालीय. येणाऱ्या दिवसात त्यांच्या सेनापतीच मंडळ दिसेल. मी असेन किंवा नसेन त्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही”