‘सुरूवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला’, भाजपच्या मंत्र्याचा रामराजे निंबाळकरांवर निशाणा
सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणं किंवा टीका करण्याची एकही संधी दोघंही सोडत नाही. फलटणमधून रामराजेंच्या उमेदवाराचा विधानसभेला पराभव असून त्याचा संदर्भ घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांवर चांगलाच निशाणा साधला.
‘सुरूवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला’, असं वक्तव्य करत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नाव न घेता माजी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संबंध पूर्ण सातारा जिल्ह्याला सर्वश्रूत आहेत. सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणं किंवा टीका करण्याची एकही संधी दोघंही सोडत नाही. फलटणमधून रामराजेंच्या उमेदवाराचा विधानसभेला पराभव असून त्याचा संदर्भ घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांवर चांगलाच निशाणा साधला. ‘मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत. गेली २० वर्षे ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेले आहे’, असं वक्तव्य जयकुमार गोरेंनी करत परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष घणाघात केला. पुढे ते असेही म्हणाले, अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली. सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांना खोचक टोला लगावला आहे.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

