‘Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा’, ‘या’ भाजप नेत्याची आक्रमक मागणी
VIDEO | उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अयोध्येत हल्ला होण्याच्या विधानावर भाजप आक्रमक, भाजप नेते आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका, काय केला संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | देशभरातील हिंदू अयोध्येतील राम मंदिराचं उद्धाटन कधी होणार याकडे डोळे लावून आहेत. तर येत्या काही दिवसात या मंदिराचं उद्धाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. या सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत लोकं ट्रेननं दाखल होणार असून यावेळी ट्रेनवर हल्ले होऊ शकतात, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अयोध्येत हल्ला होण्याच्या विधानावर नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल करताना असे म्हटले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर यासाठी एटीएसला पत्र लिहून त्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

