विधानसभेच्या प्रचारापेक्षा बॅग चेकिंगचा मुद्दा तापला, उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला; राणेंची आक्रमक मागणी
उद्धव ठाकरेंच्या प्रचाराला बंदी घाला, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. हेलिपॅडवर बॅगांची तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी नाव विचारत अपॉईंमेंट लेटर सुद्धा मागितलं. पहिले वणी त्यानंतर औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाली.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र या निवडणुकीच्या प्रचाराऐवजी बॅग चेकींगचा मुद्दा चांगलाच गाजतोय. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना अपॉईंमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रचार बंदी करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली. पहिले वणी त्यानंतर औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाली. ज्या ठिकाणी त्यांच्या बॅगांची तपासणी होते तेथे ते आपल्या मोबाईलने शूट देखील करताय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री यांच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची देखील झाडाझडती झाली. ‘माझ्याच बॅगांची तपासणी कशी? मोदी शहा आणि मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करणार का?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची देखील तपासणी झाली. पालघरमध्ये राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी शिंदे पालघरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या बॅगांची तपासणी झाली. यावेळी यूरीन पॉटवरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. वणीमध्ये बॅग तपासणीदरम्यान, यूरीन पॉटपण तपासा असं आयोगाच्या अधिकाऱ्यांना म्हटलं होतं. त्यावरूनच शिंदेंनी हा खोचक टोला लगावलाय.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

