AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं घड्याळ चिन्हावर वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या, 'आयुष्यात कधी घड्याळ्याला मतदान...'

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं घड्याळ चिन्हावर वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या, ‘आयुष्यात कधी घड्याळ्याला मतदान…’

| Updated on: Nov 14, 2024 | 11:57 AM
Share

आयुष्यात कधी वाटलं नव्हत घड्याळाला मतदान मागण्याची वेळ येईल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तर आता घड्याळाचं चित्र बदललंय अजित पवार आमच्यासोबत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. भरसभेतून पंकजा मुंडे यांनी असेही म्हटले, सगळीकडे कमळ चिन्ह दिलं असतं तर मी निवडून आणलं असतं.

परळी विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ उजनी पाटी येथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची संयुक्त जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबाबत पंकजा मुंडे यांच्याकडून पुन्हा एकदा पुन:रुच्चार करण्यात आलाय.यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सभेत घड्याळ चिन्हावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘आयुष्यात मला कधी घड्याळ्याला मतदान मागण्याची वेळ येईल, असं कधी वाटलं नव्हतं. पण आता सगळ्या निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आलीये… तर सगळीकडे कमळ चिन्ह दिलं असतं तर मी निवडून आणलं असतं.’, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं अन् चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘घड्याळ्याला निवडून आणण्याची वेळ कधी आली नव्हती पण आलीये. आता घड्याळच वेगळं झालंय. घड्याळ्याचं चित्र बदललंय. आचता अजित पवार आमच्या सोबत महायुतीत आहेत. ‘ बघा नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

Published on: Nov 14, 2024 11:57 AM