‘आपल्या वक्तव्यामुळे पप्पू होवू नये, काळजी घ्यावी’, ‘या’ मंत्र्यानं दिला आदित्य ठाकरे यांना सल्ला
VIDEO | 'सत्ता गेल्यानंतर शहाणपण येईल असं वाटत होतं पण...', 'या' मंत्र्यानं काय लगावला आदित्य ठाकरे यांना खोचक टोला?
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्याअगोदर मातोश्री येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाहीतर जेलमध्ये टाकतील असे म्हंटले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरुन राज्यात खळबळ उडाली. अशातच आता भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. टीकाच नाही तर त्यांनी सल्लाही दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये, असा खोचक सल्ला दिला, तर सत्ता गेल्यानंतर शहाणपण येईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही अशीही जहरी टीका विखे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे हे रडणारे नेते नाहीत, लढणारे नेते आहेत याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमणं उधळली आहे. सत्ता गेल्याचं वैफल्य आदित्य ठाकरे यांना झालं आहे. त्यामुळे स्वतःलाच रडू आवरत नाही. आपल्या वक्तव्यावर थोडा आवर घातला पाहीजे. आपल्यापुढे अजून मोठं आव्हान आहे, मोठ्यांचा आदर करायला शिकलं पाहीजे असा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

