‘मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं; नाराज नाही पण…’, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा खुलासा
मुनगंटीवार यांची देखील महायुती सरकारमधील मंत्रिपदाची संधी हुकली असल्याचे कालच्या नागपुरातील मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळाले. या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची देखील महायुती सरकारमधील मंत्रिपदाची संधी हुकली असल्याचे कालच्या नागपुरातील मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळाले. या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. यावेळी माध्यमांनी मुनगंटीवारांना नाराज आहात का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, मी त्या पदासाठी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे, मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना अचानक ते का वगळण्यात आलं? ते मला माहिती नाही. बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही’, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक बोलणं टाळलं. पुढे ते असेही म्हणाले, मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडेल. दरम्यान तुमचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांना केला असता, ते म्हणाले, “मग तेच खरं. कारण ते सर्व त्यांनाच माहिती असणार आहे. त्यांनी सांगितलं आहे तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहात? माझं वरिष्ठ पातळीवर कुणाशी बोलणं झालं नाही. पण तुमचं झालं आहे ना, तुम्ही वरिष्ठ पातळीवर काहीतरी बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून”, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

