Gauri Garje Death Case: पंकजा मुंडेंच्या PA ला बेड्या… फरार अनंत गर्जेला रात्री 1 वाजता अटक… डॉ. पत्नीचा शारिरीक, मानसिक छळ अन्…
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांना डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी वरळी पोलिसांनी अटक केली आहे. गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार असून, त्यांची आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू आहे.
पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांना डॉ. गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वरळी पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक काल रात्री उशिरा एक वाजता करण्यात आली. गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे, त्यांचा भाऊ आणि बहिणीवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर अनंत गर्जे फरार होते. डॉ. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे. मात्र, गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास करण्याची मागणी केली आहे. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयात डॉक्टर होत्या. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

