Jan Ashirwad Yatra | भाजपच्या मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा हे शक्तिप्रदर्शन नाही : रावसाहेब दानवे
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मराठवाड्यात आल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 शी खास संवाद साधला.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मराठवाड्यात आलेल्या रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी दानवेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पद दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच भाजपच्या मंत्र्यांची काही दिवासांपूर्वी काढलेल्या जन आशिर्वाद यात्रेवरही भाष्य केले. ही जन आशिर्वाद यात्रा म्हणजे शक्तिप्रदर्शन होतं का?असा प्रश्न विचारला असता, दानवेनी असं मुळीच नाही असं म्हणत एखादा नेता जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी बाहेर पडत असले, मंदिरात दर्शनासाठी जात असेल तर हे शक्तीप्रदर्शन नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं.
तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतही चर्चा सुरु असल्याचं रावसाहेब यांनी सांगितलं. ज्यानुसार हा प्रकल्प योग्यरित्या तयार झाल्यास मुंबई ते औरंगाबाद हा प्रवास अवघ्या दोन तासांत होईल. असं दानवेंनी सांगितलं.
Published on: Aug 17, 2021 04:36 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

