Ameet Satam | मुंबई पालिकेत 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप
मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षा शुल्क आकारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. बीएमसीमध्ये अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

कसे आकारणार अग्निसुरक्षा शुल्क
भाजपकडून सत्ताधारी शिवसेना निशाण्यावर आली आहे. मुंबई महापालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे पैसे घेतले जाणार आहेत. तर ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार आहे.
कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर, पाणीपट्टीतील वाढ याला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध केला होता. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. एक दिलासा मिळाला असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान